निमंत्रण: घरगुती वापराच्या बायो गॅस यंत्राबद्दल माहितीपर सत्र

Posted Leave a commentPosted in events, मराठी

स्थळ: डॉ. विनया भागवत याचे निवासस्थान १९, मित्रमंडळ कॉलनी न्यू उस्मानपुरा औरंगाबाद (संत एकनाथ रंगमंदिरा जवळ) 1 व २ एप्रिल सायं 5 ते 7,30 या वेळेत आपल्या सोयीनी केव्हाही येऊ शकता ‘ओला कचरा घाण नाही, इंधन आहे’ घरघुती बायोगॅस यंत्रामध्ये ओला कचरा घराच्या घरी जिरविता येतो आणि त्यामधुन स्वयंपाकासाठी गॅस मिळतो, तसेच बागेसाठी उत्तम प्रकारचे […]

कचराकोंडी जागर संवाद

Posted Leave a commentPosted in events, मराठी

औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (विभागीय केंद्र औरंगाबाद) यांनी संवाद आयोजित केला आहे https://svensktapotek.net/. त्यामध्ये वायु टीम ला बोलण्याची संधी मिळाली आहे सर्व औरंगाबादकरांना या कार्यक्रमाचे वायु टीम तर्फे निमंत्रण सोमवार, २ एप्रिल २०१८ सकाळी ९ ते दुपारी २ वा स्थळ: आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय एमजीएम परिसर, औरंगाबाद

कचरा कोंडीतून होईल का कचरा क्रांती

Posted Leave a commentPosted in green-energy, media, मराठी

औरंगाबाद मधील आपल्या वायु मित्र डॉ विनया भागवत यांनी लिहिलेला लेख. सामान्य माणसाच्या छोट्या व तंत्र-शुद्ध कृतीतून आपण कचरा कोंडी नक्कीच फोडू शकतो असा आत्मविश्वास या लेखातून मिळतो. हा लेख येथे वाचू शकतो धन्यवाद, डॉ विनया भागवत वायु-मित्र, औरंगाबाद

घरगुती, सामुहिक, विकेंद्री बायो गॅस यंत्र

Posted 1 CommentPosted in मराठी

ओल्या कचऱ्यावर घरातल्या घरात उपचार ओला कचरा म्हणजे उरलेले अन्न, भाज्यांची डेखं, फळांची सालं, चहा पत्ती, खराब झालेलं नासलेलं अन्न. हा तसाच पडून राहिला तर त्याला मुंग्या,  किडे, बुरशी, उंदीर वा घुशी त्याकडे आकर्षित होतात. हे आकर्षण त्यामध्ये दडलेल्या उर्जेचे आहे. ही उर्जा अन्न रुपात जेव्हा दडलेली असते तेव्हा ती आपल्याला पचवता येते व त्यामुळे […]

कचरा सुंदर आहे! औरंगाबादकरांना निमंत्रण!

Posted Leave a commentPosted in green-energy

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले, पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक त्याचे तया कळाले, तो राजहौंस एक! कचरा जिरवून त्यातून हरित आणि स्वच्छ इंधन निर्मिती झालेली अनुभवताना गदिमांच्या या कवितेची आठवण होते. या अत्यंत सोप्या व विकेंद्री पद्धतीचा वापर करणारे वायु-मित्र हाच आनंद अनुभवतात. कचऱ्या मध्ये दडलेली उर्जा आपल्याच घरात […]

ओळख: वायु २०० लिटर: घरगुती वापराच्या बायोगॅस यंत्राची

Posted Leave a commentPosted in मराठी

संजीवनी कुलकर्णी (डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्या घरातील ‘वायु’ 200 लिटर नमस्कार निसर्ग स्नेही मंडळी, आपल्या घरातील ओला कचरा घरीच जिरविण्यासाठी बनवलेल्या घरघुती बयोगॅस यंत्राची ओळख करून देण्यासाठी हा लेख.  हे यंत्र घरामध्ये, गॅलरी, गच्चीवर किंवा बागेतही बसवता येते. आपण सर्व निसर्गाच्या संवर्धनाबद्दल संवेदनशील आहोत. कचरा प्रश्न व हरित उर्जेची गरज या दोन्ही गरजांना सोडवण्यासाठी ‘वायु‘ हा […]