नैसर्गिक जीवनशैलीचे Community Transmission

हवामान बदल, शहारच्या बाहेर कचर्‍याचे उत्तुंग डोंगर. हे आपले आजचे वास्तव आहे. या प्रश्नांच्या मुळाशी 'आपण' आहोत. आपली आजची जीवनशैली आहे. मात्र ही बातमी चांगली आहे. प्रश्न निर्माण जर आपण केला असेल तर उत्तरही आपल्याच कडे आहे. आपण या बद्दल काहीतरी करू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो.पाहुयात कसे ते! ठिकाण: अवंती सोसायटी, सिंहगड रस्ता, पुणे. या सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन सोसायटी मध्ये वायु बसवला. सोसायटीतील ओला कचरा वायुला खाऊ घालून त्यातून...
goodwill_anagha

‘वायु’ बद्दल थोडक्यात!

घरात, सोसायटीत, गच्चीवर, बाल्कनीत, हॉटेल, कॅंटीन, कार्यालय, रेस्टोरंट जिथे वाया जाणारे अन्न तिथे वायु! 'वायु' म्हणजे वाया जाणार्‍या अन्न पदार्थापासून स्वयंपाकाचा गॅस निर्माण करणारे अत्यंत सोपे बायोगॅस यंत्र आहे. वायु वापरून आपण आपला अन्न कचर्‍याचा प्रश्न  पूर्णपणे सोडवू शकतो. त्याचबरोबर ऊर्जा स्वावलंबांनाच्या दिशेने एक पाऊल चालू शकतो. https://youtu.be/hx7n-H8Lv4Y वायु सोसायटी मध्ये बसवताना [easy-image-collage id=4499] अवंती सोसायटी, सिंहगड रोड, पुणे किसन कृपा सोसायटी, पिंपरी, पुणे स्वप्नपूर्ती सोसायटी, आकुर्डी, पुणे त्रिदल सोसायटी,...
goodwill_anagha

चळवळीत शामिल व्हा! पहिल्या volunteer बैठकीचे निमंत्रण!

हवामान बदलाचा प्रश्न इतका मोठा आहे की या भवती कृतिशील लोकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. थेंबे थेंबे साठणाऱ्या तळ्यासारखे एका ठोस कृती भवती एकत्र येऊन आपणही या चळवळीत शामिल होऊ शकतो. आपण आपल्या मोकळ्या वेळेत आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, छोट्या कृतीचा आधार या चळवळीला देऊ शकतो. आत्तापर्यंत २०० बायो गॅस यंत्रे बसवली आहेत. वाया जाणाऱ्या अन्न पदार्थापासून ऊर्जा निर्माण होत आहे व वर्षाचे १२०० सिलिंडर इतके इंधन निर्माण होते आहे....

नैसर्गिक शेती आणि आळी

कमी खर्चात, कमी जागेत, कमी पाण्यात पण पुण्यात नैसर्गिक भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार प्रयोग सुरू झाले. पाला पाचोळा (सुका कचरा), अन्न कचरा (ओला कचरा) व शेतात उगवणारे हिरव गवत अन बायोगॅस स्लरी हे वापरुन भाजीपाला लागवड सुरू केली. छोटे-छोटे पट्टे करून भाजीपाला लागवड केली यात कडधान्य, वेलवर्गीय भाज्या पासून हळदी पर्यंत अशी 38 प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली. अडीच महिन्यात भेंडी, चवळी,चुका, अंबाडीपाला, मूग, उडीद, चेरी टोमटो, दोडका, काकडी...
goodwill_anagha

निमंत्रण: ‘आपल्या गावचे प्रश्न आपणंच सोडवणारे गाव’

निमंत्रण: 'आपल्या गावचे प्रश्न आपणंच सोडवणारे गाव: बोरव्हा गावातील नागरिकांशी थेट भेट' सोमवार: 12 ऑगस्ट 2019: सायं 5.30 ते 7.30 'इंद्रधनुष्य हॉल' लोकेशन: https://goo.gl/maps/xh4x4JgswDNS8YdD6 पत्ता: सचिन तेंडूलकर जॉगिंग पार्क समोर, राजेंद्र नगर नवी पेठ, दत्तवाडी पुणे 411030 कार्यक्रमाविषयी बोरव्हा गाव हे वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात आहे. पाणी फौंडेशन मार्फत सुरु झालेल्या पाण्याच्या चळवळीत हे गावं शामिल आहे. विदर्भातले म्हणावे तर दुर्गम असे गाव. समृद्धीच्या दिशेनी स्थलांतर होऊन गावाची लोकसंख्या कमी होत...

पेस्ट कंट्रोल नंतर मनातील प्रश्नचक्र

नुकतेच आमच्या सोसायटी मध्ये पेस्ट कंट्रोल झाले. सकाळी खाली उतरलो तेव्हा मेलेल्या झुरळांचा खच पडला होता. एवढी सगळी झुरळे होती कुठे, आली कुठून? मला आश्चर्य वाटले. संध्याकाळी घरी परत आलो तेव्हा बाल्कनीत सुद्धा एक झुरळ मेलेले दिसले. तेव्हा मात्र काळजी वाटली. नुकतेच जीवित नदी या संस्थेनी विष मुक्त जीवनशैली या विषयावर कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेत शैलजा ताईंनी आपल्या रोजच्या जगण्यात कशी अनेक केमिकल्स शामिल झाली आहेत याबद्दल मांडणी केली...
goodwill_anagha

ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळेतील विद्यार्थी झाले वायु मित्र

स्वच्छता आणि ऊर्जेच्या चळवळीत विद्यार्थी शामिल करून घेण्याची आमची नेहमीच तयारी असते.  विद्यार्थी या चळवळीत उत्साह व नवीन रंग भारतात. तसेच वायु स्वतः बनवून व वापरुन अत्यंत ताकदीचे विज्ञान चालवायला शिकतात. असाच अनुभव ज्ञान प्रबोधिनी निगडी च्या शाळेत आला. पूर्वा ताई, शिवराज दादा, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड अशा अनेक उत्साही घटक यात आमच्याबरोबर शामिल होते. वायु चे विज्ञान चालवायला फार सोपे आहे. कचर्‍यात ऊर्जा दिसण्याची ताकद हे ज्ञान देते....

गणपती उत्सवा निमित्त स्वच्छतेचा संदेश

या वर्षी गणपती उत्सवात स्वच्छता विषय घेतला जातो आहे. संतनगर मित्र मंडळाने 'वायु' टीम ला हा विषय लोकांपर्यंत पोचवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल श्री विठ्ठल वाळूंज व संतनगर मित्र मंडळाचे आभार! अंदाजे 500 नागरिकांपर्यंत विषय पोचवता आला.

वायु मित्रांचे अनुभव! औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर प्रभावी उपाय

घरच्या घरी कचरा जिरवून त्यातून इंधन निर्माण करणारे वायु मित्र आपले अनुभव शेअर करत आहेत. औरंगाबाद मध्ये पडलेला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रभावी मार्ग आहे! https://youtu.be/2sQJphzUV68 या चळवळीत शामील व्हा! आपला कचरा घरच्या घरी जिरवा! 'वायु' शी मैत्री करा!   आपल्या घरी वायु बसवण्यासाठी संपर्क सागर माने: 76 201 75 930 प्रियदर्शन सहस्रबुद्धे: 76 201 99 316

निमंत्रण: घरगुती वापराच्या बायो गॅस यंत्राबद्दल माहितीपर सत्र

स्थळ: डॉ. विनया भागवत याचे निवासस्थान १९, मित्रमंडळ कॉलनी न्यू उस्मानपुरा औरंगाबाद (संत एकनाथ रंगमंदिरा जवळ) 1 व २ एप्रिल सायं 5 ते 7,30 या वेळेत आपल्या सोयीनी केव्हाही येऊ शकता 'ओला कचरा घाण नाही, इंधन आहे' घरघुती बायोगॅस यंत्रामध्ये ओला कचरा घराच्या घरी जिरविता येतो आणि त्यामधुन स्वयंपाकासाठी गॅस मिळतो, तसेच बागेसाठी उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत मिळते.   हे यंत्र विविध आकारात उपलब्ध आहे viagra generika online kaufen. दिवसाचा...
Facebook
Twitter
YouTube
LinkedIn
Instagram