निमंत्रण: ‘आपल्या गावचे प्रश्न आपणंच सोडवणारे गाव: बोरव्हा गावातील नागरिकांशी थेट भेट’

सोमवार: 12 ऑगस्ट 2019: सायं 5.30 ते 7.30

‘इंद्रधनुष्य हॉल’

लोकेशन: https://goo.gl/maps/xh4x4JgswDNS8YdD6

पत्ता: सचिन तेंडूलकर जॉगिंग पार्क समोर, राजेंद्र नगर नवी पेठ, दत्तवाडी पुणे 411030

कार्यक्रमाविषयी

बोरव्हा गाव हे वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात आहे. पाणी फौंडेशन मार्फत सुरु झालेल्या पाण्याच्या चळवळीत हे गावं शामिल आहे. विदर्भातले म्हणावे तर दुर्गम असे गाव. समृद्धीच्या दिशेनी स्थलांतर होऊन गावाची लोकसंख्या कमी होत गेली.
गावात समृद्ध जीवन जगायचे असेल तर पाण्याच्या नियोजनातून हे शक्य होऊ शकते यासाठी चळवळ वृत्तीनी लोक काम करत आहेत. पाणी फौंडेशन आयोजित Water Cup अंतर्गत  गेल्या वर्षी तालुक्यातील पहिले बक्षीस मिळाले व या वर्षी राज्य पातळीवर यांचे नामांकन झाले आहे. 11 तारखेला होणाऱ्या बक्षीस समारंभात याचा खुलासा होईल.
पाणी, त्या आधारित उपजीविका, ऊर्जा स्वावलंबन, तसेच निसर्गाचे संवर्धन करत बोरव्हा गावात समृद्ध जीवन जगण्याची चळवळ कशी चालू आहे याबद्दल गावातील लोकांकडून थेट ऐकण्यासाठी भेटूयात. संतोष वाळके यांच्या भाषेत सांगायचे तर उर्जेच्या तसेच कृषीच्या बाबतीत 22 व्या शतकाची तयारी करणारे गाव कसे काम व विचार करते आहे हे जाणून घेऊयात.
Samuchit Envirotech, LAYA, INECC आणि ‘वायु’ असे एकत्रित मिळून हा कार्यक्रम आयोजित करत आहेत.
Facebook
Twitter
YouTube
LinkedIn
Instagram