संजीवनी कुलकर्णी (डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्या घरातील ‘वायु’ 200 लिटर
नमस्कार निसर्ग स्नेही मंडळी,
आपल्या घरातील ओला कचरा घरीच जिरविण्यासाठी बनवलेल्या घरघुती बयोगॅस यंत्राची ओळख करून देण्यासाठी हा लेख. हे यंत्र घरामध्ये, गॅलरी, गच्चीवर किंवा बागेतही बसवता येते. आपण सर्व निसर्गाच्या संवर्धनाबद्दल संवेदनशील आहोत. कचरा प्रश्न व हरित उर्जेची गरज या दोन्ही गरजांना सोडवण्यासाठी ‘वायु‘ हा विकेंद्री व सहज उपाय आहे. या दोन्ही प्रश्नांना सोडवण्याची आपल्या हातात येते.
या जीवन–शैली बदलाचे फायदे पुढील प्रमाणे
१. घरातील संपूर्ण ओला कचरा (किचन वेस्ट) यंत्रा मध्ये जिरतो
आपल्या घरातील एक gram कचरा ही आपल्या घरातून बाहेर जाणार नाही. त्याच्यात दुसऱ्या माणसाला हात घालावा लागणार नाही. समाजावर व सरकारी यंत्रणेवरील आपल्या कचऱ्याचे ओझे निघून जाईल. आपल्या गाव-शहरा बाहेर साठलेले कचऱ्याचे ढीग व त्यामुळे तेथील नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी आपला खारीचा वाटा आपल्याला उचलता येईल!
२. दरवर्षी दोन ते तीन LPG सिलेंडर ची बचत होते
२ किलो कचरा पचवू शकणारा २०० लिटर चा वायु वर्षातून २ ते ३ सिलिंडर इतके इंधन निर्माण करतो. ही हरित उर्जा निर्माण करण्याची ताकद आपल्या हातात येते. जीवाश्म इंधने म्हणजे (fossil fuel) यांच्या वरील अवलंबन कमी करण्यासाठीचे हे एक ठोस पाऊल आहे!
३.बायोगॅस स्लरी: उत्तम प्रकाचे सेंद्रिय खत
यंत्र मधून जी स्लरी बाहेर पडते ती बागेसाठी, शेतीसाठी सेंद्रिय खात म्हणून वापरता येते. वापरता येते त्यामुळे खतांवरील अवलंबन व खर्च कमी होतो.
आत्तापर्यंत आम्ही ७० यंत्रे पुणे, सांगली, औरंगाबाद, उमरखेड (जिल्हा यवतमाळ), पालघर, नाशिक, हैद्राबाद या ठिकाणी बसविली आहेत. ही कार्यरत यंत्रे बघायची असल्यास आम्हाला संपर्क करावा! यंत्र ज्यांच्या घरी पहायचे आहे त्यांची व आपली सोय बघून आपण वेळ निश्चित करू!
२०० लिटर वायु, २०० लिटर गॅस साठ्ण्यासाठीचा फुगा
अधिक माहितीसाठी –
सागर – 90 96 96 44 38 प्रियदर्शन– 94 22 31 90 49
विनंती: जर काही कारणास्तव आम्ही फोन घेऊ शकलो नाही तर whatsapp/sms वर आपले नाव, संपर्क क्रमांक व तुमच्या सोयीची वेळ कळवावी. आम्ही आपल्याला नक्की संपर्क करू.
वेबसाईट: www.vaayu-mitra.com
आपण सर्व निसर्गप्रेमी मंडळींना वायु ची जादू अनुभवण्याचे मनःपूर्वक निमंत्रण!
उत्सुकतेने,
–सागर माने,
वायु–मित्र