हवामान बदल, शहारच्या बाहेर कचर्‍याचे उत्तुंग डोंगर. हे आपले आजचे वास्तव आहे. या प्रश्नांच्या मुळाशी ‘आपण‘ आहोत. आपली आजची जीवनशैली आहे. मात्र ही बातमी चांगली आहे. प्रश्न निर्माण जर आपण केला असेल तर उत्तरही आपल्याच कडे आहे. आपण या बद्दल काहीतरी करू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो.

पाहुयात कसे ते!
 
ठिकाण: अवंती सोसायटी, सिंहगड रस्ता, पुणे. या सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन सोसायटी मध्ये वायु बसवला. सोसायटीतील ओला कचरा वायुला खाऊ घालून त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅस वर दोन कुटुंबाचा स्वयंपाक होतो. हे कसे घडले याची गोष्ट पाहुयात.
 
 
 
अवंती सोसायटीत हे शक्य आहे तर आपल्याही सोसायटीत हे शक्य आहे. अनेक डोकी एकत्र येतात तेव्हा निर्णय घेणे कठीण होते. पण इंधन (म्हणजे तेलासाठी) जगात अनेक युद्धे लढावी लागली आहेत. त्यापेक्षा हे नक्कीच सोपे नाही का?
 
या कार्याचे मिशन आहे “Clean, Climate Action with Dignity”
  • कचऱ्यातून इंधन बनवून आपण जीवाष्म इंधनाचा वापर कमी करत आहोत. त्यामुळे ही सामूहिक हवामान कृती आहे. (Community Climate Action)
  • आपला ओला कचरा आपल्याच आवारात जिरवून आपण स्वच्छतेची जबाबदारी घेत आहोत. (Clean)
  • कचरा जिथल्या तिथे व वेळच्या वेळी जिरवल्यामुळे घाण होण्या आधीच त्यावर उपाय केला जातो. त्यामुळे घाण हाताळणे व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद होते. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना घाणीत काम करावे लागत नाही. घाणीत काम करावे लागत नसल्यामुळे त्यांचा सन्मान हिरावून घेतला जात नाही (Dignity)
आपल्याही घरी, सोसायटी, कॅन्टीन किंवा हॉटेल मध्ये ही चळवळ सुरु करण्यासाठी हा फॉर्म भरून आम्हाला संपर्क करा.
 
 
Clean, Climate Action with Dignity या मिशन वर!
 
टीम वायु
Facebook
Twitter
YouTube
LinkedIn
Instagram