कचरा सुंदर आहे! औरंगाबादकरांना निमंत्रण!

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले

भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले,

पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक

त्याचे तया कळाले, तो राजहौंस एक!

कचरा जिरवून त्यातून हरित आणि स्वच्छ इंधन निर्मिती झालेली अनुभवताना गदिमांच्या या कवितेची आठवण होते. या अत्यंत सोप्या व विकेंद्री पद्धतीचा वापर करणारे वायु-मित्र हाच आनंद अनुभवतात. कचऱ्या मध्ये दडलेली उर्जा आपल्याच घरात इंधनात रुपांतरीत करतात. त्यामुळे कचरा देखील सुंदर दिसू लागतो! हवा हवासा वाटतो.

कचरा म्हणजे घाण नाही. त्याच्या चुकीच्या विल्हेवाट पद्धती मुळे कचरा घाण वाटतो!

‘वायु’ हे एक घरगुती वापराचे बायो गॅस यंत्र आहे ज्यामध्ये आपण आपला अन्न कचरा जिरवून त्याचे मिथेन वायु मध्ये रुपांतर करू शकतो. मिथेन ज्वलनशील आहे व त्यावर स्वयंपाक करता येतो आपल्या LPG सारखाच. याचा वापर करून आज ९५ वायु-मित्र  अंदाजे ४५० कि कचरा दररोज आपल्याच आवारात इंधनात रुपांतरीत करत आहेत. आपला कचरा आपणच जिरवू या चळवळीत सहभागी झालेले हे सामान्य नागरिक.

Suhas Bandal

घरगुती वापराचे हे यंत्र गच्चीवर, बागेत वा बाल्कनीत लावता येऊ शकते

औरंगाबाद मध्येही ही चळवळ जोर घेत आहे. रवी रामन हे त्यापैकी एक कुटुंब. मृदुला रामन सांगतात की औरंगाबाद मध्ये कचरा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्हाला त्याचा त्रास झाला नाही. त्यांच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या रंजना मावशी तर LPG पेक्षा बायो गॅस वर स्वयंपाक करण्यास प्राधान्य देतात.

vinaya atya 200 litre vaayu

vaayu-hinjewadi-farm

या कुटुंबाशी भेटायला व ही पद्धत समजून घेण्यासाठी सत्राचे आयोजन केले आहे.

औरंगाबाद स्वच्छ करण्याच्या चळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

गुरुवार, १५ मार्च २०१८

सायं: ६ ते ८

ठिकाण,

रवी रामन यांचे निवासस्थान

प्लॉट नंबर G -48, Sector N4

CIDCO, औरंगाबाद    431 003

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *