घरगुती, सामुहिक, विकेंद्री बायो गॅस यंत्र

ओल्या कचऱ्यावर घरातल्या घरात उपचार

ओला कचरा म्हणजे उरलेले अन्न, भाज्यांची डेखं, फळांची सालं, चहा पत्ती, खराब झालेलं नासलेलं अन्न. हा तसाच पडून राहिला तर त्याला मुंग्या,  किडे, बुरशी, उंदीर वा घुशी त्याकडे आकर्षित होतात. हे आकर्षण त्यामध्ये दडलेल्या उर्जेचे आहे. ही उर्जा अन्न रुपात जेव्हा दडलेली असते तेव्हा ती आपल्याला पचवता येते व त्यामुळे जीवन शक्य होते. आपण याला कचरा म्हणतो खरं पण हा उर्जायुक्त पदार्थ आहे.

ओल्या किंवा जैविक कचऱ्याचे प्रकार व त्यावरील उपचार पद्धत

ओल्या कचऱ्याचे आपण मुख्यत्त्वे दोन प्रकारात वर्गीकरण करू शकतो. या प्रकारा नुसार त्यावर पुढे उपचार कसा करायचा हे ठरवता येते. ओला कचरा हा निसर्ग निर्मित असल्यामुळे नैसर्गिक पद्धतीनेच यावर उपायही करता येतात

 पचनीय ओला कचराज्वलनशील ओला कचरा
कचऱ्याचे प्रकारसर्व अन्न प्रकार, फळांची साले, हिरवी पाने, जनावर पचवते असा कोणताही पदार्थलाकूड, पाचोळा, वाळलेली पाने, नारळाच्या करवंट्या
उपचार

– एका कुटुंब पातळीवर चे घरगुती बायोगॅस यंत्र

– सामुहिक बायोगॅस

– खत निर्मिती

– कोळसा निर्मिती

विकेंद्री व सहकार तत्त्वातून परिणामकारक उपाय

ओल्या कचऱ्यावर जितका विकेंद्री उपचार केला जाईल तितकी त्याची परिणामकारकता वाढते. कचऱ्याची वाहतूक, त्यामध्ये काम करणारी माणसे या सर्वांवरील ताण कमी होतो. तसेच त्यावर शास्त्रशुद्ध  उपचार करून त्यातून उपयोगी इंधन व खत बनवून त्याचा लाभ तेथील नागरिकांना मिळू शकतो.

Suhas Bandal

गच्चीवर बसवलेला ‘वायु’

घरच्या घरी अथवा सामुहिक बायोगॅस

एका घरासाठी स्वतंत्र यंत्र

– बाल्कनीत, गच्चीत, बागेत लावून आपला कचरा आपणच जिरवणे

– सोय व इच्छे नुसार भाजी आणतो तेव्हा काही खराब भाजी, फळे आणून टाकणे

5 कुटुंबाचे सामुहिक यंत्र

– पाच कुटुंबांचा समूह करणे, सर्वांचा कचरा एका यंत्रात टाकणे

– गॅस चा वापर कसा करायचा व त्यानुसार कोणी किती गुंतवणूक करायची याचा निर्णय सामोपचाराने घेणे

सोसायटी साठी सामुहिक यंत्र

– सोसायटी साठी सामुहिक यंत्र बसवूणे

– गॅस चा वापर काही कुटुंबांनी करणे

– सोसायटीच्या वॉचमन असेल तर त्या कुटुंबाला गॅस देणे

– पुण्यातील स्वप्नपूर्ती सोसायटी मध्ये असे यंत्र बसवेले आहे

????????????????????????????????????

बाल्कनी मध्ये बसवलेला वायु:

एक कुटुंब किंवा दोन कुटुंबांमध्ये सामुहिक वापर होऊ शकतो

vaayu-hinjewadi-farm

7.5 कि कचरा दिवसाचा पचवू शकतो: 5 कुटुंबांमध्ये कचरा जिरवण्यासाठी याचा सामुहिक वापर होऊ शकतो

औरंगाबाद मध्ये 7 ठिकाणी वायु बसवलेला आहे.  रवी रामन (सिडको) व डॉ विनया भागवत (न्यू उस्मानपुरा) यांच्याकडे यंत्र बघू शकतो. ही यंत्रे बघायची असल्यास आम्हाला संपर्क करावा. तसेच आज पर्यंत एकूण 95 ठिकाणी विविध आकाराचे वायु बसवले आहेत. या सर्व वायु मित्रांच्या एकत्रित प्रयत्नातून रोजचा 450 किलो कचरा जागच्या जागी उर्जेत रुपांतरीत होत आहे.

अधिक माहिती व आपल्या घरी अथवा सोसायटीत वायू बसवायचा असेल तर आमचा संपर्क

सागर: 90 96 96 44 38

प्रियदर्शन: 94 22 31 90 49

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *