Schoolमराठी

ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळेतील विद्यार्थी झाले वायु मित्र

स्वच्छता आणि ऊर्जेच्या चळवळीत विद्यार्थी शामिल करून घेण्याची आमची नेहमीच तयारी असते.  विद्यार्थी या चळवळीत उत्साह व नवीन रंग भारतात. तसेच वायु स्वतः बनवून व वापरुन अत्यंत ताकदीचे विज्ञान चालवायला शिकतात. असाच अनुभव ज्ञान प्रबोधिनी निगडी च्या शाळेत आला. पूर्वा ताई, शिवराज दादा, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड अशा अनेक उत्साही घटक यात आमच्याबरोबर शामिल होते.

वायु चे विज्ञान चालवायला फार सोपे आहे. कचर्‍यात ऊर्जा दिसण्याची ताकद हे ज्ञान देते. या विद्यार्थ्यांकडून प्रोत्साहन घेऊन अधिकाधिक नागरिक या स्वच्छतेच्या व स्वच्छ ऊर्जेच्या चळवळीत शामिल होतील अशी आम्हाला खात्री आहे!

आपल्या शाळेत, सोसायतीत, घरात वायु  वापरायचा असल्यास आम्हाला जरूर संपर्क करा.

Email vaayu.mitra@gmail.com

www.facebook.com/vaayu.mitra

सागर (90 96 96 44 38) , (76 201 75 930)

प्रियदर्शन (94 22 31 90 49 ), (76 201 99 316)

 

View this post on Instagram

ओला कचरा हा काय आहे, तर आपल्या स्वयंपाक घरातील राहिलेले शिल्लक अन्न,निवडलेल्या भाजीपाल्याची देठे ,ताटातील खरकटे अन्नपदार्थ. हेच अन्नपदार्थ आपल्या शारीरिक उर्जेचा स्रोत आहे, पण तो आपली गरज संपली कि कचरा होतो. त्याला ओला कचरा हि उपाधी मिळाली कि त्याची उपयुक्तता शून्य होते व ती एक मोठी समस्या वाटते. याच ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीचे विज्ञान विद्यार्थी शिकत आहेत्त. आपला परिसर स्वच्छ व समृद्ध असला पाहिजे याच जाणीवेतून विद्यार्थ्यानी त्यांच्या शाळेच्या मेस मध्ये निर्माण होणऱ्या ओला कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची ठरवली व हा प्रश्न नसून तो उर्जेच्या प्रश्नाचे उत्तर आहे. जी गोष्ट या विद्यार्थ्यांना समजली आहे,ती इतरांनाही समजली आहे पण फक्त प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा. ओला कचरा हा उर्जेचा स्रोत आहे हिच इच्छाशक्ती कमी असल्याने हा प्रश्न मोठा वाटू लागतो. या विद्यार्थ्यांची प्रचंड इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ओला कचरा हा समस्या नसून अपारंपरिक हरित उर्जेचा स्रोत आहे, हा विषय या मुलांनपर्यंत पोहचला आहे व त्यांनी कृतीतही आणला ,तर मग आपण कुठे कमी पडतोय याचा विचार गंभीरपणे करायला हवा आहे. #vaayu_mitra #clean_india #clean_india_green_india #swachhbharat

A post shared by Vaayu Mitra (@vaayumitra) on

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *