कमी खर्चात, कमी जागेत, कमी पाण्यात पण पुण्यात नैसर्गिक भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार प्रयोग सुरू झाले. पाला पाचोळा (सुका कचरा), अन्न कचरा (ओला कचरा) व शेतात उगवणारे हिरव गवत अन बायोगॅस स्लरी हे वापरुन भाजीपाला लागवड सुरू केली. छोटे–छोटे पट्टे करून भाजीपाला लागवड केली यात कडधान्य, वेलवर्गीय भाज्या पासून हळदी पर्यंत अशी 38 प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली. अडीच महिन्यात भेंडी, चवळी,चुका, अंबाडीपाला, मूग, उडीद, चेरी टोमटो, दोडका, काकडी आदि भाजीपाला मिळण्यास सुरूवात झाली.
वरील चित्र: हळदीवर आलेली आळी
सातत्याने पडणार्या पाऊसातून पीक चांगलं तग धरून उभ राहील. या नैसर्गिक चळवळीत आळी सहभागी झाली आहे. आणि आमची शाळा चालू झाली.
मुख्य म्हणजे हळद व भेंडी च्या पानावर या आळ्या आहेत. दोन्ही वरील आळया वेग–वेगळ्या प्रकारच्या आहेत. हळदीवरील आळी ही आकाराने मोठी आहे व काळ तोंड असलेली आहे. निरीक्षण केल्यावर असे दिसते की हाळदीच पान खाऊन झाल्यावर ती त्याच पानाला दुमडते करते व स्वत भोवती गुंडाळून ठेवते. काही ठिकाणी पान उघडल्यावर तिथे पांढर्या रंगाचा पदार्पथ आढळला.
वरील चित्र: पांढरा पदार्थ
भेंडीवरील आळी ही हिरव्या रंगाची बारीक लांबट व चालताना मधून वाकते. तुरळक पांढर्या रंगाचे केस पार्श्वभाग तोंडाजवळ नेते अन तोंड पुन्हा उचलून पुढे ठेवते. पान खाते अन चांगल्या पानाला चिरून दुमडते करते व त्यात राहते.
सध्या तरी निरीक्षण करणे असे ठरले आहे. पाहू काय काय रूपे पाहायला मिळतात आळीची.
—
संतोष गवळे