Green Energy

प्रदर्शनात भेटीचे निमंत्रण

मित्रांनो, या वेळी दिवाळी निमित्त तुम्हाला एका वेगळ्या लक्षमीचे पूजन करण्याची सुसंधी आहे. आपल्या घरातच असलेली ही लक्ष्मी सध्या आपण घराबाहेर घालवत आहोत. विज्ञान रुपी सरस्वतीच्या साहाय्याने आपण तिचे घरातच पूजन करूया! आपण जाणताच की आपले शहर कचऱ्याच्या एका जटिल प्रश्नाने ग्रासले गेले आहे. पण या आव्हानातूनच एका नव्या संधीचा जन्म झाला आहे. आपण आपल्याच …

प्रदर्शनात भेटीचे निमंत्रण Read More »

कचरा कोंडीतून होईल का कचरा क्रांती

औरंगाबाद मधील आपल्या वायु मित्र डॉ विनया भागवत यांनी लिहिलेला लेख. सामान्य माणसाच्या छोट्या व तंत्र-शुद्ध कृतीतून आपण कचरा कोंडी नक्कीच फोडू शकतो असा आत्मविश्वास या लेखातून मिळतो. हा लेख येथे वाचू शकतो धन्यवाद, डॉ विनया भागवत वायु-मित्र, औरंगाबाद

कचरा सुंदर आहे! औरंगाबादकरांना निमंत्रण!

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले, पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक त्याचे तया कळाले, तो राजहौंस एक! कचरा जिरवून त्यातून हरित आणि स्वच्छ इंधन निर्मिती झालेली अनुभवताना गदिमांच्या या कवितेची आठवण होते. या अत्यंत सोप्या व विकेंद्री पद्धतीचा वापर करणारे वायु-मित्र हाच आनंद अनुभवतात. कचऱ्या मध्ये दडलेली उर्जा आपल्याच घरात …

कचरा सुंदर आहे! औरंगाबादकरांना निमंत्रण! Read More »