‘वायु’ बद्दल थोडक्यात!

घरात, सोसायटीत, गच्चीवर, बाल्कनीत,

हॉटेल, कॅंटीन, कार्यालय, रेस्टोरंट

जिथे वाया जाणारे अन्न तिथे वायु!

‘वायु’ म्हणजे वाया जाणार्‍या अन्न पदार्थापासून स्वयंपाकाचा गॅस निर्माण करणारे अत्यंत सोपे बायोगॅस यंत्र आहे. वायु वापरून आपण आपला अन्न कचर्‍याचा प्रश्न  पूर्णपणे सोडवू शकतो. त्याचबरोबर ऊर्जा स्वावलंबांनाच्या दिशेने एक पाऊल चालू शकतो.

वायु सोसायटी मध्ये बसवताना

[easy-image-collage id=4499]

  • अवंती सोसायटी, सिंहगड रोड, पुणे
  • किसन कृपा सोसायटी, पिंपरी, पुणे
  • स्वप्नपूर्ती सोसायटी, आकुर्डी, पुणे
  • त्रिदल सोसायटी, श्रेय नगर, औरंगाबाद

या काही सोसायटी आहेत जिथे ही चळवळ पोचली आहे. कचरा जिरवणे हा मुख्य उद्देश. गॅसचा वापर करायचा या बद्दल सोसायटी आपापला निर्णय घेते. स्वप्नपूर्ती सोसायटी मध्ये गॅस वॉचमन ला पुरवला आहे. तर अवंती सोसायटी मध्ये दोन कुटुंबांना गॅस वापरतात. इथे कुटुंबांची गॅसची बचत होते. किसन कृपा सोसायटी मध्ये एक कुटुंब पूर्णपणे एलपीजी मुक्त आहे आणि लवकरच आजून एक कुटुंब मुक्त होईल. ही ऊर्जा ताकद आज वाया जात आहेच पण त्यामुळे कचर्‍याचे ढीग लागलेले आहेत. हे आपण थांबवू शकतो!

वायु आपल्या हॉटेल, कॅंटीन, कार्यालयासाठी बसवताना

सुपर्ण मंगल कार्यालय, अरण्येश्वर जवळ, पुणे, इथे गच्चीवर वायु बसवला आहे. इथे कचरा तर जिरतो आहेच, गॅस बचतही होते आहेच आणि त्याचबरोबर वायु मधून जी स्लरी मिळते त्यावर गच्चीवर नैसर्गिक भाजीपाला लागवडही केली जाते. याबद्दल नुकतेच महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहून आले. व त्याबद्दल या लिंक वर व्हिडिओ पाहू शकता.

https://www.facebook.com/punemata/videos/347178786162690/

या चळवळीत शामिल होण्यासाठी आमचा संपर्क!

सागर: 76 201 7 5 930

प्रियदर्शन: 76 201 99 316

वायु बद्दल माहिती या लेखात वाचयला मिळेल!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *